बारामती : दहीहंडी उत्सवासाठी पुण्याच्या दिशेने जात असलेल्या बारामतीतील तीन तरुणांच्या दुचाकीचा दिवे घाट परिसरात अपघात झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या अपघातात गौरव (बारीक) चव्हाण, वय १८ वर्षे, रा. अमराई, बारामती याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहीहंडी उत्सवासाठी हे तीन तरुण बारामतीहून पुण्याच्या दिशेने निघाले होते. दिवे घाट परिसरात त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या दुर्घटनेत गौरव चव्हाण याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्याच्यासोबत असलेले अन्य दोन तरुण जखमी झाले आहेत.
जखमी तरुणांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
💔 उत्सवाचा आनंद क्षणात दुःखात बदलला
दहीहंडीच्या उत्सवासाठी उत्साहाने पुण्याकडे निघालेल्या तरुणांवर काळाने घाला घातल्याने बारामतीतील अमराई परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अवघ्या १८व्या वर्षी गौरवचा मृत्यू झाल्याने कुटुंबीय, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
उत्सव साजरा करताना सुरक्षिततेची काळजी घ्या; जीव अनमोल आहे.

✍🏻मुख्य संपादक – मंगलदास तुकाराम निकाळजे
मोबाईल नंबर – 8390041414










