दैनिक ‘तुफान क्रांती’ परिवाराकडून पुरस्कार जाहीर; सहकाऱ्यांसह उपस्थित राहण्याचे निमंत्रण
बारामती | प्रतिनिधी :
माहिती अधिकार क्षेत्रातील कार्य आणि सामाजिक कार्याची दखल घेत कार्याध्यक्ष, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, बारामती येथील मंगलदास तुकाराम निकाळजे यांना राज्यस्तरीय आदर्श सेवारत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दैनिक ‘तुफान क्रांती’ परिवाराच्या वतीने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, याबाबतचे निमंत्रणपत्र संपादक मिर्झा गालिब मुजावर यांनी पाठविले आहे.
गेल्या काही वर्षांतील सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने २०२६ सालासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्याच अनुषंगाने मंगलदास निकाळजे यांची राज्यस्तरीय आदर्श सेवारत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
माहिती अधिकाराच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी मदत करणे, सार्वजनिक प्रश्नांना वाचा फोडणे आणि विविध सामाजिक समस्यांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधणे, जनतेची कामे करणे अशा कामांमुळे निकाळजे यांचे नाव चर्चेत राहिले आहे.
११ ऑक्टोबर रोजी पुरस्कार वितरण सोहळा
रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता हॉटेल जगदंब पॅलेस, वरवंड येथे हा पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे निमंत्रणपत्रात नमूद करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सहकुटुंब व मित्रपरिवारासह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन दैनिक ‘तुफान क्रांती’ परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यस्तरावर पुरस्कारासाठी निवड झाल्याने माहिती अधिकार आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ही प्रेरणादायी बाब मानली जात आहे. या सन्मानामुळे भविष्यातही नागरिकांचे प्रश्न, सार्वजनिक हित आणि पारदर्शक प्रशासनासाठी काम करण्यास प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – मंगलदास तुकाराम निकाळजे
मोबाईल नंबर – 8390041414










