बारामती तालुक्यातील मोरगाव-आंबी बु. परिसरातील घटना; ₹2.76 लाखांचा औषधसाठा जप्त
बारामती : मोरगाव (ता. बारामती) परिसरातील सार्वजनिक रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत मुदतबाह्य औषधे व वैद्यकीय साहित्य टाकून दिल्याप्रकरणी शशांक सदाशिव वाघ, मूळ रा. मोरगाव, ता. बारामती, जि. पुणे, सध्या रा. कोथरूड, पुणे याच्याविरुद्ध सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. FIR मध्ये आरोपीचे नाव स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांच्या FIR नुसार, २ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १.५० वाजता मोरगाव-आंबी बु. रोडलगतच्या मोकळ्या परिसराची पाहणी केली असता तेथे एलसोल कंपनीचे ६० बॉक्स, अंदाजे ३,००० बाटल्या आणि पिल्सोल कॅप्सूलचे ६० बॉक्स, अंदाजे ६,००० कॅप्सूल असा मुदतबाह्य औषधसाठा आढळून आला. या जप्त मालाची एकूण किंमत ₹२ लाख ७६ हजार असल्याचे FIR मध्ये नमूद आहे.
FIR मधील फिर्यादीच्या जबाबानुसार, सदर मुदतबाह्य औषधे शशांक सदाशिव वाघ यांच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी टाकण्यात आल्याचे समजल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर पोलिसांनी व पंचांच्या उपस्थितीत औषधसाठा जप्त करून पुढील कायदेशीर कार्यवाही केली.
या प्रकरणी शशांक सदाशिव वाघ याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 272, 292 तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. FIR क्रमांक 0180/2026 असून, गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष बिजम पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

✍🏻मुख्य संपादक – मंगलदास तुकाराम निकाळजे
मोबाईल नंबर – 8390041414












