JANATECHA AWAJ

सुपा पोलीस ठाण्यात आरोपींच्या मदतीसाठी दोन लाखांची मागणी केल्याचा आरोप; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
५० हजार रुपयांच्या व्यवहाराचाही उल्लेख; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार का?

मोरगाव, सुपा, ता. बारामती : बारामती तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वढाणे येथील एका गुन्ह्याच्या संदर्भात संशयित आरोपींच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी झाल्याचा आरोप समोर आला आहे. या कथित आर्थिक व्यवहारासंदर्भातील मोबाईल ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

संबंधित प्रकरणात ५० हजार रुपयांच्या व्यवहाराचाही उल्लेख असल्याचा दावा होता आहे. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांना कमी रक्कम मान्य होणार नसल्याच्या आशयाचे संभाषण एका पोलीस कर्मचाऱ्याने केल्याचा आरोप आहे. मात्र, या संभाषणाची सत्यता आणि त्यातील व्यक्तींची ओळख स्वतंत्रपणे अधिकृतरीत्या सिद्ध झालेली नाही.

वरिष्ठांच्या नावाचा वापर झाला का?

या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून स्वतःहून पैशांची मागणी केली का, की या कथित व्यवहारात अन्य कोणाची भूमिका होती, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना या कथित व्यवहाराची माहिती होती का, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.

ऑडिओ क्लिपची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी

कथित ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळण्यासाठी तांत्रिक तपासणी करावी, संभाषणातील व्यक्तींची ओळख निश्चित करावी आणि आर्थिक मागणीच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्याची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात येत आहे परंतु या प्रकरणात कार्यवाही होणार का हा प्रश्न उपस्थित होता आहे.

आता पोलीस प्रशासनाची भूमिका काय असणार?

या प्रकरणातील आरोपांची सत्यता अद्याप स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नसल्याने चौकशीचा निष्कर्ष महत्त्वाचा ठरणार आहे. आरोप सिद्ध झाल्यास  संबंधिता पोलीस कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई होणार का, तसेच या कथित व्यवहारामागील वस्तुस्थिती समोर येणार का?याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

The post सुपा पोलीस ठाण्यात आरोपींच्या मदतीसाठी दोन लाखांची मागणी केल्याचा आरोप; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल appeared first on JANATECHA AWAJ.

काटेवाडीत जातिवाचक शिवीगाळ करत कोयता, चाकूने हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
बारामती : बारामती तालुक्यातील दीपनगर, काटेवाडी येथे जातिवाचक शिवीगाळ करून कोयता, चाकू आणि उसाने मारहाण केल्याच्या आरोपावरून पाच जणांविरुद्ध बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडल्याचे प्रथम माहिती अहवालात नमूद आहे.

या प्रकरणी फिर्यादी अनिल संजय बनसोडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. एफआयआरमध्ये आरोपी म्हणून १) शुभम संतोष करे, २) ओम संतोष करे, ३) अजिंक्य राजाराम पांढरे, ४) शंभू वणवे आणि ५) शंभू जराड यांची नावे नमूद आहेत.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, सागर मदने याच्यासोबत झालेल्या पूर्वीच्या भांडणाच्या पार्श्वभूमीवर आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोर येऊन वाद घातल्याचा आरोप आहे. यावेळी जातिवाचक शिवीगाळ व धमकी देण्यात आली. फिर्यादीची पत्नी शैला यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तसेच शुभम करे, ओम करे आणि अजिंक्य पांढरे यांनी कोयत्याने, शंभू जराड याने चाकूने, तर शंभू वणवे याने उसाने मारहाण केल्यामुळे फिर्यादी जखमी झाल्याचा आरोप आहे. आरडाओरडा ऐकून शेजारी जमा झाल्यानंतर संबंधित व्यक्ती मोटारसायकलवरून निघून गेल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमे, शस्त्र अधिनियम तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपासाची जबाबदारी पोलीस उपअधीक्षक चैतन्य वसंतराव कदम यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे.

The post काटेवाडीत जातिवाचक शिवीगाळ करत कोयता, चाकूने हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on JANATECHA AWAJ.

बारामतीत राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ला प्रकरणात दोघांना अटक; २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
बारामती, प्रतिनिधी : बारामतीतील पालखी महामार्गावर पायलट ढाब्यासमोर राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर पिस्तूलातून गोळीबार करून तसेच लोखंडी सत्तूरने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात बारामती तालुका पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पुणे शहर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांकडे पुढील तपासासाठी सोपवले. न्यायालयाने दोघांना २३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

१८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.१० वाजण्याच्या सुमारास पालखी महामार्गावरील पायलट ढाब्यासमोर ही घटना घडल्याची नोंद पोलिसांत आहे. लक्ष्मीकांत महादेव सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींपैकी एका व्यक्तीने राणा सूर्यवंशी यांच्यावर पिस्तूलातून गोळीबार केला. त्यानंतर लोखंडी सत्तूरने त्यांच्या हातावर आणि पोटाच्या बाजूला वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५२१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १०९(१), ११८(१), ११८(२), ११५(२), ३(५) तसेच शस्त्र अधिनियमातील कलम ३, ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तांत्रिक विश्लेषणातून तपासाला दिशा

बारामती तालुका पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेसनोटनुसार, गुन्ह्याच्या तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यानंतर विधी संघर्षग्रस्त बालक आणि पार्थ वासुदेव अवघडे (वय १९ वर्षे) यांना पुणे शहर पोलिसांनी पकडून पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले.

पुढील चौकशीत ज्ञानदेव महादेव शिंदे (वय ५० वर्षे), व्यवसाय चालक व मॅनेजमेंट, यांचेही नाव समोर आल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे. संबंधित व्यक्तींनी या गुन्ह्याच्या कारणासाठी दोन लाख रुपये दिल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

पोलिसांनी २० ऑक्टोबर २०२६ रोजी पार्थ वासुदेव अवघडे आणि ज्ञानदेव महादेव शिंदे यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना २३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

या गुन्ह्याचा हेतू आणि इतर संभाव्य सहभागी व्यक्तींबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस करीत आहेत. तपासातून या प्रकरणातील आणखी बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

The post बारामतीत राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ला प्रकरणात दोघांना अटक; २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी appeared first on JANATECHA AWAJ.

बारामती सत्र न्यायालयाचा निकाल; अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी वडिलांना जन्मठेप, पीडितेला ५ लाखांची भरपाई
सावत्र आईची निर्दोष मुक्तता; बचाव पक्षाचे वकील अॅड. अमोल सोनवणे यांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

बारामती | प्रतिनिधी :

अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या आणि तिला गर्भवती केल्याच्या प्रकरणात बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी वडिलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच पीडितेला ५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. याच प्रकरणातील सहआरोपी सावत्र आईची मात्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी हा निकाल दिला.

वीटभट्टीवरील घटनेप्रकरणी गुन्हा दाखल

अभियोगाच्या कथनानुसार, सन २०२२ मध्ये आरोपी वडील आपली अल्पवयीन मुलगी आणि पत्नी यांच्यासह वीटभट्टीवर कामासाठी आले होते. २७ डिसेंबर २०२२ पासून मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

पीडिता गर्भवती असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वीटभट्टी मालकाच्या पत्नीने तिच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पीडितेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात सावत्र आईवरही धमकी देणे आणि गुन्ह्यास प्रोत्साहन देण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या आरोपांनंतर तिलाही अटक करण्यात आली होती.

सावत्र आईची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

सहआरोपी सावत्र आईच्या वतीने अँड. अमोल सोनवणे यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यांनी लेखी व तोंडी युक्तिवाद करताना प्रत्येक आरोपीविरुद्धचे आरोप आणि उपलब्ध पुरावे स्वतंत्रपणे तपासण्याची आवश्यकता अधोरेखित केली. साक्षीदारांच्या उलटतपासणीतूनही बचाव पक्षाने विविध मुद्दे न्यायालयासमोर मांडले.

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि एकूण १२ साक्षीदारांच्या साक्षींचा विचार करून न्यायालयाने सावत्र आईची निर्दोष मुक्तता केली. या निकालामुळे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातही प्रत्येक आरोपीची जबाबदारी स्वतंत्रपणे तपासून पुराव्यांच्या आधारे निर्णय घेण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले.

पीडितेला पाच लाखांची भरपाई

मुख्य आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याबरोबरच न्यायालयाने पीडितेला पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. या प्रकरणात पीडितेला न्याय मिळण्याच्या दृष्टीने हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे.

या खटल्यात अँड.अमोल सोनवणे यांना ऍड. अविनाश जाधव, रितिक गायकवाड, राजरत्न ताकतोडे, वैभव झगडे, राहुल गिरमे, सागर खरात, अँड. रवींद् सोनवणे आणि लीगल एड पॅनेलचे अँड. सुमित पाटील यांचे सहकार्य लाभले.

The post बारामती सत्र न्यायालयाचा निकाल; अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी वडिलांना जन्मठेप, पीडितेला ५ लाखांची भरपाई appeared first on JANATECHA AWAJ.

खासगी रुग्णालयांना दरपत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारक; महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई | प्रतिनिधी

रुग्णांना उपचारांचा खर्च समजणे सोपे व्हावे, वैद्यकीय सेवांमध्ये पारदर्शकता यावी आणि अनावश्यक आर्थिक तक्रारी टाळता याव्यात, यासाठी राज्यातील खासगी रुग्णालये व इतर वैद्यकीय आस्थापनांना सेवा आणि सुविधांचे दरपत्रक स्पष्टपणे प्रदर्शित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक जारी केले आहे.

१६ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या या परिपत्रकानुसार, महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी अधिनियम व नियमावली २०२१ मधील अनुसूची III च्या अनुषंगाने संबंधित वैद्यकीय आस्थापनांनी दरपत्रक प्रदर्शित करण्याच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

शासनाच्या निर्देशानुसार, रुग्णालयांनी उपलब्ध वैद्यकीय सेवा, उपचारपद्धती आणि सुविधांचे दर स्पष्टपणे दर्शवावेत. दरपत्रक रुग्णालयाच्या आवारातील सहज दिसणाऱ्या आणि सहज प्रवेश करता येणाऱ्या ठिकाणी लावणे आवश्यक आहे. तसेच, दरपत्रक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये असावे. दरांमध्ये बदल झाल्यास संबंधित दरपत्रक तातडीने अद्ययावत करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

बिलिंग प्रक्रियेत पारदर्शकतेवर भर

रुग्णांना उपचारांचा संभाव्य खर्च समजावा आणि बिलासंदर्भातील तक्रारींचे निराकरण करता यावे, यासाठी रुग्णालयांनी सेवा शुल्क आणि विविध पॅकेजेसच्या दरांबाबत पुरेशी माहिती उपलब्ध करून द्यावी, असे परिपत्रकात नमूद आहे. नोंदणी कक्ष, चौकशी कक्ष आणि बिलिंग काउंटरवरील कर्मचाऱ्यांनीही रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना दरपत्रक आणि शुल्काबाबत योग्य मार्गदर्शन करावे.

परदेशी रुग्णांसाठी स्वतंत्र दरपत्रक

वैद्यकीय उपचारांसाठी भारतात येणाऱ्या परदेशी रुग्णांना सेवा देणाऱ्या रुग्णालयांनी मेडिकल व्हिसा किंवा आयुष व्हिसावर उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांसाठी लागू असलेले विशेष पॅकेज दर स्पष्टपणे प्रदर्शित करावेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

नियमभंग करणाऱ्या संस्थांवर कारवाईचे निर्देश

राज्यातील खासगी रुग्णालये व इतर वैद्यकीय आस्थापनांच्या नोंदणी, नियमन आणि देखरेखीसाठी जबाबदार सक्षम प्राधिकरणांनी दरपत्रक प्रदर्शनाच्या नियमांचे वेळोवेळी अनुपालन परीक्षण करावे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित संस्थांवर आवश्यक प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

या परिपत्रकाच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महानगरपालिकांचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी आणि संबंधित सक्षम प्राधिकरणांवर सोपविण्यात आली आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे रुग्णांना उपचारांवरील संभाव्य खर्चाची माहिती मिळण्यास मदत होणार असून, वैद्यकीय सेवांमधील पारदर्शकता वाढविण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण प्रशासकीय निर्देश मानला जात आहे.

The post खासगी रुग्णालयांना दरपत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारक; महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय appeared first on JANATECHA AWAJ.

प्लास्टिक ग्लास विक्रीप्रकरणी नितीन वाईन्सवर कारवाई; ५ हजारांचा दंड
बारामती नगरपरिषदेची कारवाई; प्लास्टिक ग्लास जप्त

बारामती, प्रतिनिधी : बारामती शहरातील कसबा-साठेनगर परिसरातील नितीन वाईन्स येथे प्लास्टिक ग्लास विक्री होत असल्याच्या तक्रारीनंतर बारामती नगरपरिषदेने संबंधित दुकानावर कारवाई केली. या कारवाईत ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असून प्लास्टिक ग्लास जप्त करण्यात आले आहेत.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आरोग्य निरीक्षक अजय लालबिगे यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी अक्षय माने, समीर तांबोळी, संतोष जगताप आणि अयुब पठाण यांनी कारवाईत सहभाग घेतला.

शहरात प्रतिबंधित प्लास्टिकच्या विक्री आणि वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपरिषदेकडून तपासणी व कारवाई करण्यात येत आहे. प्लास्टिक बंदीच्या नियमांची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

दरम्यान, शहरातील प्रतिबंधित प्लास्टिकच्या विक्री व वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित आस्थापनांची तपासणी करून नियमानुसार कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

The post प्लास्टिक ग्लास विक्रीप्रकरणी नितीन वाईन्सवर कारवाई; ५ हजारांचा दंड appeared first on JANATECHA AWAJ.

शेतातील अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्याला चाप; मनाई आदेशाचे उल्लंघन झाल्यास अर्जदाराला मोफत पोलीस संरक्षण देण्याची तरतूद!
मामलतदार न्यायालय अधिनियमात महत्त्वाची सुधारणा; मात्र भूमिअभिलेख विभागाच्या ऑनलाइन प्रणालीतील त्रुटींमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी कायम

बारामती | प्रतिनिधी

शेतीच्या बांधावरून होणारे वाद, शेतातील अतिक्रमण, बांध कोरणे तसेच शेतरस्ते आणि पाण्याच्या वहिवाटीत अडथळे निर्माण करण्याच्या प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणारी महत्त्वपूर्ण कायदेशीर तरतूद करण्यात आली आहे. मामलतदार न्यायालय अधिनियम, १९०६ मध्ये सुधारणा करून कलम २१ मध्ये पोटकलम (५) नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. या तरतुदीनुसार, मामलतदार न्यायालयाने दिलेल्या मनाई आदेशाचे पालन करण्यास संबंधित व्यक्तीने कसूर केल्यास, नियमानुसार अर्जदाराला मोफत पोलीस संरक्षण पुरविण्याची तरतूद करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने २४ जुलै २०२६ रोजी काढलेल्या शासन परिपत्रकात या सुधारणांच्या अंमलबजावणीसंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, संबंधित प्रकरणात मनाई आदेशाचे पालन करण्यासाठी बाधित व्यक्तीने पोलिसांकडे लेखी विनंती केल्यास, कायद्यातील तरतुदीनुसार मोफत पोलीस संरक्षण देण्याची कार्यवाही करण्यात यावी. तसेच, मामलतदारांनी संबंधित आदेशामध्ये या संरक्षणाबाबत स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

शेतातील अतिक्रमणाविरोधात कायदेशीर आधार

शेतजमिनीच्या बांधावरून होणारे वाद, पिकांचे नुकसान, शेतरस्त्यांवरील अडथळे, पाण्याच्या वहिवाटीचे प्रश्न आणि जमिनीच्या वापरासंबंधीचे वाद ग्रामीण भागात अनेकदा निर्माण होतात. अशा प्रकरणांमध्ये मामलतदार न्यायालयाकडून आदेश मिळाल्यानंतरही संबंधित व्यक्तीने आदेशाचे पालन केले नाही, तर बाधित शेतकऱ्याला प्रत्यक्षात दिलासा मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो.

नवीन तरतुदीमुळे अशा परिस्थितीत अर्जदाराला कायदेशीर आधार मिळू शकतो. मात्र, मोफत पोलीस संरक्षणाची कार्यवाही ही संबंधित कायदेशीर अटी, न्यायालयाचा आदेश आणि विहित प्रक्रियेनुसार केली जाणे आवश्यक आहे.

ई-मेलद्वारे नोटीस बजावण्याचीही तरतूद

सुधारित कायद्यात नोटीस बजावण्याच्या प्रक्रियेतही बदल करण्यात आले आहेत. नोटीस संबंधित व्यक्तीला प्रत्यक्ष देणे, योग्य पद्धतीने पाठविणे किंवा कायद्यात नमूद केलेल्या परिस्थितीत इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करणे, यासंबंधी तरतुदी करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम २३० च्या अनुषंगानेही नोटीस बजावण्याच्या प्रक्रियेबाबत तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे.

तथापि, ग्रामीण भागातील अनेक खातेदारांकडे ई-मेलची सुविधा उपलब्ध नसते. काही नागरिकांना ई-मेल वापरणे, संदेश तपासणे किंवा ऑनलाइन नोटीस समजून घेणे अवघड जाते. त्यामुळे केवळ डिजिटल प्रक्रियेवर अवलंबून न राहता, संबंधित व्यक्तीपर्यंत नोटीस प्रत्यक्ष आणि प्रभावीपणे पोहोचेल, याची प्रशासनाने दक्षता घेणे आवश्यक आहे.

भूमिअभिलेख विभागाच्या प्रणालीवर प्रश्नचिन्ह

कायद्यातील सुधारणा स्वागतार्ह असली, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये दुसरी गंभीर समस्या समोर येत आहे. भूमिअभिलेख विभागाच्या अद्ययावत ऑनलाइन प्रणालीमध्ये काही प्रकरणांत अतिक्रमणाचे नेमके क्षेत्र, संबंधित व्यक्तीचे नाव किंवा आवश्यक तपशील स्पष्टपणे उपलब्ध होत नसल्याची तक्रार आहे.

अतिक्रमणाचे क्षेत्रफळ, संबंधित गट क्रमांक, हद्दींचे तपशील आणि संबंधित खातेदाराची माहिती स्पष्ट नसल्यास अर्जदाराला आपले म्हणणे प्रभावीपणे मांडणे कठीण होते. परिणामी, अर्ज किंवा अपील वेळेत निकाली काढण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. यामुळे कायद्यातून मिळणाऱ्या संरक्षणाचा प्रत्यक्ष लाभ घेण्याच्या प्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता आहे.

प्रशासनाने त्रुटी दूर कराव्यात

महसूल विभाग, भूमिअभिलेख विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांनी ऑनलाइन प्रणालीतील त्रुटी दूर करून अतिक्रमणाचे क्षेत्र, संबंधित व्यक्तीचे नाव, गट क्रमांक आणि मोजणीविषयक माहिती अचूक व सहज उपलब्ध होईल, याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. तसेच, नोटीस बजावणे, सुनावणी घेणे आणि अर्ज-अपील निकाली काढणे या प्रक्रियांमध्ये पारदर्शकता व वेळेचे पालन होणे गरजेचे आहे.

कायद्यातील सुधारणा ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असली, तरी तिची प्रभावी अंमलबजावणी, अचूक भूमिअभिलेख आणि वेळेत न्याय मिळणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा, कागदोपत्री संरक्षण मिळूनही प्रत्यक्षात अतिक्रमणग्रस्त शेतकऱ्यांना न्यायासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

The post शेतातील अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्याला चाप; मनाई आदेशाचे उल्लंघन झाल्यास अर्जदाराला मोफत पोलीस संरक्षण देण्याची तरतूद! appeared first on JANATECHA AWAJ.

बारामतीत पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बदलले; रविवार आणि सोमवारी अनेक भागांत पाणीपुरवठा बंद
नीरा डावा कालव्याचा प्रवाह बंद झाल्याने पाणीसाठा मर्यादित; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे नगरपरिषदेचे आवाहन

बारामती | प्रतिनिधी

बारामती शहर आणि परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना बारामती नगरपरिषदेने प्रसिद्ध केली आहे. नीरा डावा कालव्यामधील पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने तसेच उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्याने शहरातील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ आणि सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी शहरातील विविध भागांत पाणीपुरवठा होणार नसल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे.

नगरपरिषदेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत बारामती शहर, रुई आणि बारामती ग्रामीण भागात नियोजित पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यानंतर एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नीरा डावा कालव्यामधील पाण्याचा प्रवाह पूर्ववत होईपर्यंत ही व्यवस्था लागू राहणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

रविवार, १८ ऑक्टोबर रोजी या भागांत पाणीपुरवठा बंद

रविवारी म्हाडा कॉलनी, मुजावर वाडा, देवकळे इस्टेट, पानगल्ली, समर्थनगर, आमराई, सिद्धार्थनगर, विठ्ठलनगर, सुहासनगर, चंद्रमणीनगर, वडार सोसायटी, कोअर हाऊस इंदापूर रोड, एस.टी. स्टँड परिसर, सटवाजीनगर, जवाहरनगर, पोस्ट रोड, हंबीर बोळ, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, सिनेमा रोड, विजय नगर, साईगणेशनगर, आकल्पित सोसायटी, अशोकनगर, आनंदनगर, मयुरेश्वर अपार्टमेंट, भिगवण रोड, वसंतनगर, अवधूतनगर, व्हील कॉलनी, तापोवन कॉलनी, विवेकानंदनगर, अवचट इस्टेट, कृष्णचेन कॉलनी, महादेव मळा, सद्गुरुनगर, पतंगशाहनगर, मेढदरोड, श्रावण गल्ली, कोठडी गल्ली, तांदुळवाडी वेस चौक, सिद्धेश्वर गल्ली, मारवाड महावीर पथ, कुरकुट गल्ली, नेवसे रोड, सुभाष चौक, कसबा गल्ली, कोठारी रोड, व्यायामनगर, गावठाण, साईनगर आणि ग्रीन पार्कसह रुई परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

सोमवार, १९ ऑक्टोबर रोजीही पाणीपुरवठा बंद

सोमवारी कसबा फलटण रोड, रेणुकानगर, मुल्ला वस्ती, शिक्षक सोसायटी, लक्ष्मीनारायणनगर, माळेगाव रोड, हनुमाननगर, माळेगाव कॉलनी, सातव वस्ती, शिवाजी नगर, जामदार रोड, कारभारी नगर, सावतानगर, सावतानगरमधील परिसर, श्रीरामनगर, चांदणी चौक, पंचशीलनगर, साठेनगर, जगताप मळा, जुना मोरगाव रोड, खंडोबानगर आणि नवीन मोरगाव रोड परिसरासह व्यायामनगर, गावठाण, साईनगर व ग्रीन पार्क या भागांत पाणीपुरवठा होणार नाही.

नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

पाणीपुरवठ्यातील या बदलामुळे नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन बारामती नगरपरिषदेने केले आहे. नीरा डावा कालव्यामधील पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरू होईपर्यंत नऊ दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्याची नोंद घ्यावी, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकातील बदल लक्षात घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज अनिल भुसे यांनी केले आहे.

The post बारामतीत पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बदलले; रविवार आणि सोमवारी अनेक भागांत पाणीपुरवठा बंद appeared first on JANATECHA AWAJ.

बारामतीत गोवंशाच्या तीन गायींची कथित बेकायदेशीर वाहतूक; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
शिवाजी चौकात पहाटे महिंद्रा पिकअप वाहनाची तपासणी; आवश्यक परवाने व कागदपत्रे सादर न केल्याचा फिर्यादीचा आरोप

बारामती | प्रतिनिधी

बारामती शहरातील शिवाजी चौक परिसरात गोवंशाच्या तीन गायींची कथित बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजून २१ मिनिटांनी प्रथम माहिती अहवाल (FIR क्रमांक ०४३३/२०२६) नोंदविण्यात आला आहे.

एफआयआरमधील माहितीनुसार, ८ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास शिवाजी चौक परिसरात पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकअप वाहनातून तीन गायींची वाहतूक होत असल्याचे फिर्यादी किरण बाळू कांबळे यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने वाहन थांबवून पाहणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

सदर वाहनाचा क्रमांक MH-42-M-4276 असल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. वाहनाच्या मागील मालवाहू भागात लोखंडी जाळी व ताडपत्रीचे आच्छादन होते. त्यामध्ये अंदाजे दोन वर्षे, १४ महिने आणि १३ महिने वयाच्या तीन गायी असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.

वाहनचालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव खाजासाहब हाजीसाहब देसाई असे सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच, संबंधित गायी इमाम हुसेन शेख यांच्या मालकीच्या असल्याचे चालकाने सांगितल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे.

परवाने आणि वाहतुकीच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

तक्रारीनुसार, गायींच्या मालकीसंबंधी कागदपत्रे, वाहतुकीचा उद्देश, आवश्यक परवाने आणि इतर संबंधित पुरावे मागविण्यात आले; मात्र अधिकृत पुरावे सादर करण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाहनातील गायींसाठी पाणी व चाऱ्याची व्यवस्था नसल्याचेही फिर्यादीने नमूद केले आहे. त्यामुळे गायींची वाहतूक कत्तलीच्या उद्देशाने केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

विविध कायद्यांनुसार गुन्हा नोंद

या प्रकरणी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६० चे कलम ११(१)(ड), महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम, १९७६ चे कलम ५बी व ९, तसेच प्राण्यांचे परिवहन नियम, १९७८ मधील कलम ४७, ४८, ४९ व ५२ आणि भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

एफआयआरनुसार, या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार रामचंद्र वामनराव शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

दरम्यान, हा प्रथम माहिती अहवालातील आरोपांचा तपशील असून, प्रकरणातील आरोपांची सत्यता, वाहतुकीमागील नेमका उद्देश आणि संबंधितांची जबाबदारी याबाबतचा अंतिम निष्कर्ष पोलीस तपास व न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल.

The post बारामतीत गोवंशाच्या तीन गायींची कथित बेकायदेशीर वाहतूक; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on JANATECHA AWAJ.

मंगलदास निकाळजे यांना राज्यस्तरीय ‘आदर्श सेवारत्न पुरस्कार’ प्रदान!
दैनिक ‘तुफान क्रांती’ परिवाराच्या वतीने सन्मान; माहिती अधिकार व सामाजिक क्षेत्रातील कार्याचा गौरव

वरवंड | प्रतिनिधी

समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या आणि माहिती अधिकाराच्या, पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या मंगलदास तुकाराम निकाळजे यांना राज्यस्तरीय ‘आदर्श सेवारत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी वरवंड येथील हॉटेल जगदंब पॅलेस येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. दैनिक ‘तुफान क्रांती’ परिवाराच्या वतीने आयोजित या सन्मानामुळे त्यांच्या सामाजिक कार्याला नवी प्रेरणा मिळाली आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत मंगलदास निकाळजे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पारंपरिक फेटे परिधान केलेले मान्यवर, सन्मानचिन्हांचे वितरण आणि पुरस्कार स्वीकारतानाचे आनंददायी क्षण यांमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. निकाळजे यांनी सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र स्वीकारताना त्यांच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.

माहिती अधिकाराच्या माध्यमातून जनसेवेचा ध्यास

मंगलदास तुकाराम निकाळजे हे बारामती येथील माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच जनतेचा आवाज चे मुख्य संपादक आहेत नागरिकांना शासकीय कामकाजाची माहिती मिळावी, सार्वजनिक प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधले जावे आणि सर्वसामान्यांच्या अडचणींना न्याय मिळावा, जनतेचे प्रश्न सुटवेत या उद्देशाने माहिती अधिकार व सामाजिक क्षेत्रात काम करण्याचे महत्त्व मोठे आहे. अशा कार्याची दखल घेऊन त्यांची राज्यस्तरीय ‘आदर्श सेवारत्न पुरस्कार’साठी निवड करण्यात आली होती.

दैनिक ‘तुफान क्रांती’ परिवाराने सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार जाहीर केला होता. त्यानुसार आयोजित सोहळ्यात निकाळजे यांना प्रत्यक्ष पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामुळे पुरस्कार जाहीर झाल्यापासून सुरू असलेला आनंदाचा क्षण प्रत्यक्ष सन्मानाने अधिक संस्मरणीय ठरला.

सन्मानातून सामाजिक कार्याला नवी ऊर्जा

समाजातील प्रश्न समजून घेऊन ते प्रशासनापर्यंत पोहोचवणे, नागरिकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणे आणि सार्वजनिक हितासाठी सातत्याने प्रयत्न करणे, ही लोकशाही अधिक सक्षम करणारी कामे आहेत. अशा कार्यकर्त्यांचा सन्मान झाल्याने इतरांनाही समाजासाठी पुढाकार घेण्याची प्रेरणा मिळते. मंगलदास निकाळजे यांना मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

जनतेचे प्रश्न, सार्वजनिक हित आणि पारदर्शक प्रशासन यांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना मिळणारे असे पुरस्कार समाजातील सकारात्मक कार्याला बळ देतात. मंगलदास निकाळजे यांना मिळालेला राज्यस्तरीय ‘आदर्श सेवारत्न पुरस्कार’ हा त्यांच्या सामाजिक कार्याच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

The post मंगलदास निकाळजे यांना राज्यस्तरीय ‘आदर्श सेवारत्न पुरस्कार’ प्रदान! appeared first on JANATECHA AWAJ.