नीरा डावा कालव्याचा प्रवाह बंद झाल्याने पाणीसाठा मर्यादित; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे नगरपरिषदेचे आवाहन
बारामती | प्रतिनिधी
बारामती शहर आणि परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना बारामती नगरपरिषदेने प्रसिद्ध केली आहे. नीरा डावा कालव्यामधील पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने तसेच उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्याने शहरातील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ आणि सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी शहरातील विविध भागांत पाणीपुरवठा होणार नसल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे.
नगरपरिषदेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत बारामती शहर, रुई आणि बारामती ग्रामीण भागात नियोजित पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यानंतर एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नीरा डावा कालव्यामधील पाण्याचा प्रवाह पूर्ववत होईपर्यंत ही व्यवस्था लागू राहणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
रविवार, १८ ऑक्टोबर रोजी या भागांत पाणीपुरवठा बंद
रविवारी म्हाडा कॉलनी, मुजावर वाडा, देवकळे इस्टेट, पानगल्ली, समर्थनगर, आमराई, सिद्धार्थनगर, विठ्ठलनगर, सुहासनगर, चंद्रमणीनगर, वडार सोसायटी, कोअर हाऊस इंदापूर रोड, एस.टी. स्टँड परिसर, सटवाजीनगर, जवाहरनगर, पोस्ट रोड, हंबीर बोळ, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, सिनेमा रोड, विजय नगर, साईगणेशनगर, आकल्पित सोसायटी, अशोकनगर, आनंदनगर, मयुरेश्वर अपार्टमेंट, भिगवण रोड, वसंतनगर, अवधूतनगर, व्हील कॉलनी, तापोवन कॉलनी, विवेकानंदनगर, अवचट इस्टेट, कृष्णचेन कॉलनी, महादेव मळा, सद्गुरुनगर, पतंगशाहनगर, मेढदरोड, श्रावण गल्ली, कोठडी गल्ली, तांदुळवाडी वेस चौक, सिद्धेश्वर गल्ली, मारवाड महावीर पथ, कुरकुट गल्ली, नेवसे रोड, सुभाष चौक, कसबा गल्ली, कोठारी रोड, व्यायामनगर, गावठाण, साईनगर आणि ग्रीन पार्कसह रुई परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
सोमवार, १९ ऑक्टोबर रोजीही पाणीपुरवठा बंद
सोमवारी कसबा फलटण रोड, रेणुकानगर, मुल्ला वस्ती, शिक्षक सोसायटी, लक्ष्मीनारायणनगर, माळेगाव रोड, हनुमाननगर, माळेगाव कॉलनी, सातव वस्ती, शिवाजी नगर, जामदार रोड, कारभारी नगर, सावतानगर, सावतानगरमधील परिसर, श्रीरामनगर, चांदणी चौक, पंचशीलनगर, साठेनगर, जगताप मळा, जुना मोरगाव रोड, खंडोबानगर आणि नवीन मोरगाव रोड परिसरासह व्यायामनगर, गावठाण, साईनगर व ग्रीन पार्क या भागांत पाणीपुरवठा होणार नाही.
नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
पाणीपुरवठ्यातील या बदलामुळे नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन बारामती नगरपरिषदेने केले आहे. नीरा डावा कालव्यामधील पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरू होईपर्यंत नऊ दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्याची नोंद घ्यावी, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकातील बदल लक्षात घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज अनिल भुसे यांनी केले आहे.

✍🏻मुख्य संपादक – मंगलदास तुकाराम निकाळजे
मोबाईल नंबर – 8390041414










