वेश्या व्यवसायाच्या आरोपांवर तक्रार करूनही तपास थंडावला; पोलिसांच्या भूमिकेवर माहिती अधिकार कार्यकर्त्याचा सवाल
भिगवण | प्रतिनिधी :
भिगवण व परिसरातील काही लॉजमध्ये अनैतिक मानवी व्यापार व वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्याने माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी,बारामती तसेच भिगवण पोलीस ठाणे यांच्याकडे लेखी तक्रारी निवेदन देऊन गोपनीय चौकशी व कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. मात्र, निवेदन देऊनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप निकाळजे यांनी केला आहे.
निवेदनात भिगवण परिसरातील आनंद लॉज, सत्यजित लॉज, अशो का लॉज, आर्यन लॉज, तसेच इतर काही लॉजमध्ये अनैतिक पद्धतीने व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या ठिकाणी महिला-मुलींना आणणे, ग्राहक उपलब्ध करून देणे, लॉजच्या खोल्यांचा गैरवापर करणे किंवा दलालांमार्फत व्यवसाय चालविणे अशा प्रकारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात CCTV फुटेज, प्रवेश नोंदवही, ग्राहक नोंदणी रजिस्टर, ओळखपत्रांच्या नोंदी, खोल्यांचे बुकिंग रेकॉर्ड तसेच संबंधित लॉज मालक, व्यवस्थापक, कर्मचारी व दलालांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
“पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय एवढा व्यवसाय राज रोज कसा सुरू राहतो?”
निकाळजे यांनी आता पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “जर या लॉजमध्ये अशा प्रकारचा अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे, तर अद्याप कारवाई का झाली नाही? निवेदनानंतर गोपनीय चौकशी करण्यात आली का? CCTV व इतर रेकॉर्ड तपासण्यात आले का?” असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.
“पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात कथित वेश्या व्यवसाय रोज उघडपणे कसा सुरू राहू शकतो?” असा गंभीर प्रश्नही त्यांनी उपस्थित केला असून, संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मात्र, पोलिस प्रशासनाची अधिकृत चौकशी किंवा कारवाई होईपर्यंत संबंधित लॉज किंवा व्यक्ती दोषी आहेत असे निश्चितपणे म्हणता येणार नाही. त्यामुळे या तक्रारीची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्याची गरज आहे.
प्रशासन आता काय करणार?
निवेदनाला प्रतिसाद देऊन पोलिस प्रशासनाने चौकशी केली आहे का, कोणते पुरावे तपासले आहेत, संबंधित लॉजची तपासणी झाली का आणि काही गुन्हा आढळल्यास कोणती कारवाई करण्यात आली—याबाबतची माहिती प्रशासनाने स्पष्ट करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
“तक्रार करूनही कारवाई होत नसेल, तर नागरिकांनी नेमके कोणाकडे दाद मागायची?” असा सवाल उपस्थित करत निकाळजे यांनी या प्रकरणात तातडीने निष्पक्ष चौकशी व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे आणि लवकरच आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

✍🏻मुख्य संपादक – मंगलदास तुकाराम निकाळजे
मोबाईल नंबर – 8390041414











