Homeमहाराष्ट्रनिलेशभाई कोठारी यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड; कबीर तांबोळी कार्यकारिणी सदस्य

निलेशभाई कोठारी यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड; कबीर तांबोळी कार्यकारिणी सदस्य

नवी दिल्लीतील राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत महत्त्वाचे निर्णय; स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवारांच्या हक्कांसाठी देशव्यापी संघटन विस्ताराचा निर्धार

नवी दिल्ली, दि. २० सप्टेंबर २०२६ | प्रतिनिधी

स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवारांच्या हक्क, सन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठेसाठी देशव्यापी संघटन उभारण्याचा निर्धार स्वतंत्रता सेनानी उत्तराधिकारी परिवार समिती (रजि.) या गैरराजकीय संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अर्धवार्षिक बैठकीत करण्यात आला. या बैठकीत निलेशभाई कोठारी यांची महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी, तर कबीरभाई तांबोळी यांची कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली.

नवी दिल्ली येथील प्रेस क्लब ऑफ इंडिया, रायसीना रोड येथे झालेल्या बैठकीस देशातील २१ राज्यांमधून ४२ राष्ट्रीय व प्रादेशिक प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष देशबंधूजी होते. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष द्विजेंद्र मोहन शर्मा, राष्ट्रीय महासचिव जितेंद्र रघुवंशी, कार्यकारी महासचिव चंद्रप्रकाश बाजपेई (माजी आमदार), राष्ट्रीय संघटन सचिव कपूर सिंह दलाल यांच्यासह विविध राज्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.

पाच कोटी उत्तराधिकाऱ्यांना एका व्यासपीठावर आणण्याचा संकल्प

राष्ट्रीय महासचिव जितेंद्र रघुवंशी यांनी संघटनेच्या आगामी कार्याचा आढावा घेताना देशभरातील स्वातंत्र्यसैनिक परिवारांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यापक जनसंपर्क आणि संघटन विस्तार अभियान राबविण्याची गरज व्यक्त केली. देशातील सुमारे पाच कोटी उत्तराधिकाऱ्यांना एका व्यासपीठावर आणण्याचा संकल्प बैठकीत व्यक्त करण्यात आला.

सध्या संघटना २३ राज्यांमध्ये कार्यरत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. स्वातंत्र्यसैनिक परिवारांच्या सन्मान, अधिकार व हितासाठी तसेच सामाजिक आणि जनहिताच्या विविध उपक्रमांसाठी संघटना काम करत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यनिहाय सुविधांचा आढावा

राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष द्विजेंद्र मोहन शर्मा यांनी विविध राज्यांमध्ये स्वातंत्र्यसैनिक परिवारांना मिळणाऱ्या सुविधा, सन्मान आणि शासकीय तरतुदींचा आढावा घेतला. पंजाब, उत्तराखंड, आसाम आणि छत्तीसगडमधील विविध अधिसूचना व तरतुदींवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

देशातील सर्व राज्यांमध्ये स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवारांना समान सन्मान, सुविधा आणि अधिकार मिळावेत, यासाठी शासनस्तरावर संघटितपणे पाठपुरावा करण्याची कार्ययोजना निश्चित करण्यात आली.

युवा व मातृशक्तीला संघटनेत संधी

स्वातंत्र्यसैनिक परिवारातील पहिल्या पिढीचे वाढते वय लक्षात घेता संघटनेच्या पुढील वाटचालीत युवा आणि मातृशक्तीला अधिक सक्रिय करण्याचा निर्णय घेण्यात आला. मातृशक्ती मंच आणि युवा मंच अधिक सक्षम करून नव्या पिढीला संघटनेच्या कार्याशी जोडण्यावर भर देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील गोपालदास गुजराती यांनी शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाबाबत जनजागृती निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम सुरू असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही या अभियानाशी जोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निलेशभाई कोठारी यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड

संघटनेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल निलेशभाई कोठारी यांचा बैठकीत गौरव करण्यात आला. स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी केलेला त्याग, गांधीवादी विचार आणि स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास गावोगावी पोहोचविण्यासाठी त्यांनी केलेल्या जनजागृतीच्या कार्याची दखल घेण्यात आली.

पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये संघटनेचे कार्य विस्तारण्यास त्यांनी योगदान दिल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. त्यानंतर निलेशभाई कोठारी यांची महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

महाराष्ट्रासाठी विविध मागण्यांचा पाठपुरावा करणार

प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर निलेशभाई कोठारी यांनी महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवारांच्या विविध मागण्यांचा शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला.

त्यांनी स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवारांना ‘राष्ट्रीय वारसा’ म्हणून मान्यता, मानधन व इतर सुविधा, एसटी व रेल्वेमध्ये मोफत प्रवासाची सुविधा, शेतीसाठी जमीन तसेच निवासासाठी जागा किंवा घर उपलब्ध करून देणे, घरपट्टी व पाणीपट्टीसारख्या स्थानिक करांमध्ये सवलत, कुटुंबीयांना ओळखपत्रे देणे आदी मागण्या मांडल्या.

याशिवाय स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवारांच्या आर्थिक उन्नतीसाठी ‘स्वातंत्र्यसैनिक आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करावे, कुटुंबीयांना वैद्यकीय उपचाराच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, शैक्षणिक शुल्कात सवलत द्यावी, वसतिगृहांमध्ये जागा राखीव ठेवाव्यात तसेच केंद्र व राज्य शासनातील नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद करावी, अशा मागण्यांचाही त्यांनी उल्लेख केला.

या मागण्यांबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असून त्याची जबाबदारी निलेशभाई कोठारी यांच्यावर सोपविण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

पदाधिकाऱ्यांचा गौरव

बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे व सन्मानपत्रे प्रदान करण्यात आली. राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील गोपालदास गुजराती यांनाही नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. आसाम युनिटच्या वतीने पारंपरिक ‘पटका’ परिधान करून पदाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

राष्ट्रीय अध्यक्ष देशबंधूजी यांनी स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग, राष्ट्रप्रेम, संघर्ष आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.

बैठकीस मृगांक शेखर आनंद, चंद्रप्रकाश वाजपेई, सुबेदार विजेंद्र सिंह, ए. वेद रत्नम, ओमप्रकाश मांझी, कमलचंद्र लहकर, मोनोतोष दास, माल रेड्डी राजशेखर, कपूर सिंह दलाल, अनुराग सिंह गौतम, आदित्य कुमार गहलोत, राजेश प्रताप सिंह, परमजीत सिंह टीवाना, सुषमा शर्मा, निलेशभाई कोठारी, कबीर तांबोळी, डॉ. अमरनाथ, दिव्याकांत झा, डॉ. उषा किरण बाजपेई, दीपा दास, आदित्य प्रताप सिंह रघुवंशी यांच्यासह विविध राज्यांतील पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

बैठकीचा समारोप राष्ट्रगीताने झाला. २६ ऑक्टोबर रोजी अमरकंटक येथे होणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक संमेलनास देशभरातील परिवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

RELATED ARTICLES

२ ऑक्टोबरला बारामतीत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त कार्यक्रम

0
स्वातंत्र्यसैनिक संघटनांकडून आयोजन; सकाळी ११ वाजता हुतात्मा स्तंभ येथे कार्यक्रम बारामती | प्रतिनिधी : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त बारामती...

तावशीतील अंगणवाडी बांधकामावर गंभीर प्रश्न; मंजूर ठिकाण बदलल्याचा आरोप

0
अपूर्ण व निकृष्ट बांधकामासह ₹11.19 लाखांच्या अंतिम बिलाची चौकशी करण्याची मागणी; माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा परिषदेकडे निवेदन इंदापूर | प्रतिनिधी इंदापूर तालुक्यातील तावशी येथे अनुसूचित...

🚨 कोरेगाव भीमा जयस्तंभाच्या जमिनीचा ताबा जमादार कुटुंबाकडेच!

0
पुणे दिवाणी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; ९.२५ एकर जमिनीवरून सुरू असलेल्या वादाला मोठे वळण पुणे | प्रतिनिधी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभ आणि त्यालगतच्या सुमारे ९.२५ एकर...
- Advertisment -

Most Popular

सुपा पोलीस ठाण्यात आरोपींच्या मदतीसाठी दोन लाखांची मागणी केल्याचा आरोप; कथित...

0
५० हजार रुपयांच्या व्यवहाराचाही उल्लेख; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार का? मोरगाव, सुपा, ता. बारामती : बारामती तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वढाणे येथील एका...

काटेवाडीत जातिवाचक शिवीगाळ करत कोयता, चाकूने हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0
बारामती : बारामती तालुक्यातील दीपनगर, काटेवाडी येथे जातिवाचक शिवीगाळ करून कोयता, चाकू आणि उसाने मारहाण केल्याच्या आरोपावरून पाच जणांविरुद्ध बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

बारामतीत राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ला प्रकरणात दोघांना अटक; २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस...

0
बारामती, प्रतिनिधी : बारामतीतील पालखी महामार्गावर पायलट ढाब्यासमोर राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर पिस्तूलातून गोळीबार करून तसेच लोखंडी सत्तूरने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या...

बारामती सत्र न्यायालयाचा निकाल; अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी वडिलांना जन्मठेप, पीडितेला ५...

0
सावत्र आईची निर्दोष मुक्तता; बचाव पक्षाचे वकील अॅड. अमोल सोनवणे यांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा बारामती | प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या आणि...

खासगी रुग्णालयांना दरपत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारक; महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

0
मुंबई | प्रतिनिधी रुग्णांना उपचारांचा खर्च समजणे सोपे व्हावे, वैद्यकीय सेवांमध्ये पारदर्शकता यावी आणि अनावश्यक आर्थिक तक्रारी टाळता याव्यात, यासाठी राज्यातील खासगी रुग्णालये व इतर...

error: Content is protected !!