Homeमहसूलखरीप हंगाम २०२६ : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पुणे जिल्ह्यातील ८...

खरीप हंगाम २०२६ : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांचा समावेश

बारामती, दौंड, पुरंदरसह पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांना ‘ट्रिगर-१’ लागू; शेतकऱ्यांना विविध सवलती व मदत उपाययोजना

बारामती| प्रतिनिधी

खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमान व इतर निकषांच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून ‘ट्रिगर-१’ लागू करण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला आहे.

या निर्णयानुसार पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, दौंड, पुरंदर आणि इंदापूर यांचा समावेश आहे. शासनाच्या परिशिष्टातील माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील या ८ तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१’ लागू करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी कोणत्या सवलती?

‘ट्रिगर-१’ लागू झालेल्या तालुक्यांमध्ये शासनाने विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये—

जमीन महसूल वसुलीस स्थगिती

पीक कर्जाचे पुनर्गठन

शेतकऱ्यांकडील कर्जवसुलीस स्थगिती

कृषी पंपांच्या वीजबिलाबाबत सवलत

शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी

रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता करून अधिकाधिक कामे सुरू करणे

आवश्यक त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा वापर

टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये रोहित्रांच्या वीज जोडणीबाबत उपाययोजना

शेतमजूर व रोजगारावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना अन्नधान्याची उपलब्धता

जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देणे

जलसंधारणाची कामे सुरू करणे

पिण्याचे पाणी व जनावरांसाठी पाण्याचे नियोजन

यांचा समावेश आहे.

राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये परिणाम

शासनाच्या परिशिष्टानुसार ‘ट्रिगर-१’ लागू झालेल्या तालुक्यांची एकूण संख्या २६५ आहे. यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.

शासन निर्णयात दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार परिस्थितीचे मूल्यांकन करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. कृषी आयुक्तांच्या अहवालाच्या आधारे संबंधित तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१’ लागू झाल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

विशेष म्हणजे, पुणे जिल्ह्यातील बारामतीसह आठ तालुक्यांचा समावेश असल्याने खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सवलती व उपाययोजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

स्रोत : महाराष्ट्र शासन, मदत व पुनर्वसन विभाग, शासन निर्णय दिनांक २५ सप्टेंबर २०२६.

RELATED ARTICLES

सुपा-कुतवळवाडी रस्त्यावर ४ ब्रास मुरूम पकडला; महसूल विभाग आता काय करणार?

0
पोलिसांनी गुन्हा दाखल केला; तहसीलदारांकडून दंडात्मक कारवाई आणि वाहन जप्तीबाबत प्रश्नचिन्ह बारामती | प्रतिनिधी सुपा-कुतवळवाडी रस्त्यावर विनापरवाना गौण खनिज मुरूमाची वाहतूक केल्याच्या आरोपावरून सुपा पोलिसांनी दोन...

अविभाजित मालमत्तेतील स्वतःचा वाटा सह-मालकांना विकता येतो; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

0
नागपूर : मालमत्तेच्या विभाजनाचा दावा न्यायालयात प्रलंबित असला, तरी सह-मालकाला संबंधित मालमत्तेतील स्वतःच्या वाट्याची विक्री करता येते, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर...
- Advertisment -

Most Popular

सुपा पोलीस ठाण्यात आरोपींच्या मदतीसाठी दोन लाखांची मागणी केल्याचा आरोप; कथित...

0
५० हजार रुपयांच्या व्यवहाराचाही उल्लेख; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार का? मोरगाव, सुपा, ता. बारामती : बारामती तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वढाणे येथील एका...

काटेवाडीत जातिवाचक शिवीगाळ करत कोयता, चाकूने हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0
बारामती : बारामती तालुक्यातील दीपनगर, काटेवाडी येथे जातिवाचक शिवीगाळ करून कोयता, चाकू आणि उसाने मारहाण केल्याच्या आरोपावरून पाच जणांविरुद्ध बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

बारामतीत राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ला प्रकरणात दोघांना अटक; २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस...

0
बारामती, प्रतिनिधी : बारामतीतील पालखी महामार्गावर पायलट ढाब्यासमोर राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर पिस्तूलातून गोळीबार करून तसेच लोखंडी सत्तूरने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या...

बारामती सत्र न्यायालयाचा निकाल; अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी वडिलांना जन्मठेप, पीडितेला ५...

0
सावत्र आईची निर्दोष मुक्तता; बचाव पक्षाचे वकील अॅड. अमोल सोनवणे यांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा बारामती | प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या आणि...

खासगी रुग्णालयांना दरपत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारक; महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

0
मुंबई | प्रतिनिधी रुग्णांना उपचारांचा खर्च समजणे सोपे व्हावे, वैद्यकीय सेवांमध्ये पारदर्शकता यावी आणि अनावश्यक आर्थिक तक्रारी टाळता याव्यात, यासाठी राज्यातील खासगी रुग्णालये व इतर...

error: Content is protected !!