Homeक्राईमकंत्राटी नेमणुकीसाठी महिलेकडून ७० हजार रुपये घेतल्याचा आरोप; बारामतीत महिलेविरोधात गुन्हा दाखल

कंत्राटी नेमणुकीसाठी महिलेकडून ७० हजार रुपये घेतल्याचा आरोप; बारामतीत महिलेविरोधात गुन्हा दाखल

पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सफाई कामगाराच्या नेमणुकीचे आमिष; बारामती पोलिसांत BNS 318(4) अन्वये कारवाई

बारामती | प्रतिनिधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथे कंत्राटी पद्धतीने सफाई कामगार म्हणून नेमणूक करून देण्याचे आमिष दाखवून ७० हजार रुपये घेतल्याचा आरोप असलेल्या महिलेविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या FIR नुसार, सुनिता संतोष शिंदे (रा. देसाई इस्टेट, बारामती) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाची तक्रार संजिवनी पांडुरंग नाळे यांनी केली आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करत असून आरोपी महिला देखील संबंधित ठिकाणी काम करत होती. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपीने कंत्राटी कामासाठी पैसे द्यावे लागतील, असे सांगितल्याने सुरुवातीला ४० हजार रुपये रोख देण्यात आले. त्यानंतर उर्वरित रकमेसंदर्भातही मागणी करण्यात आली.

FIR मध्ये नमूद माहितीनुसार, १६ डिसेंबर २०२५ ते २२ डिसेंबर २०२५ या कालावधीत पैशांच्या व्यवहारासंदर्भातील घटना घडल्याचे नमूद आहे. तसेच तक्रारीत आरोपीच्या नातेवाईकाच्या Google Pay क्रमांकावर ३० हजार रुपये पाठविल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे एकूण ७० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणाची माहिती बारामती तालुका पोलिसांना २३ सप्टेंबर २०२६ रोजी मिळाल्यानंतर सायंकाळी ६.५० वाजता FIR नोंदविण्यात आला. प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल रामदास लक्ष्मण जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

नेमणुकीच्या नावाखाली पैशांचा व्यवहार?

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामाच्या नेमणुकीसाठी पैशांची मागणी झाल्याचा आरोप असल्याने या प्रकरणाच्या तपासातून पैसे नेमके कोणत्या कारणासाठी घेण्यात आले, संबंधित नेमणुकीबाबत कोणते आश्वासन देण्यात आले आणि पैशांचा व्यवहार कोणाकडे झाला अजून कोण यात सामील आहे, हे पैसे कोणाला द्यायला घेतले होते, अजून किती महिलांकडून पैसे घेतले आहेत याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

या प्रकरणाचा आवाज उठवून पाठपुरावा जनतेचा आवाजचे मुख्य संपादक मंगलदास निकाळजे यांनी केला होता याची दाखल घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.

RELATED ARTICLES

बारामतीत ₹4 लाखांचे मंगळसूत्र हिसकावून पळाले; दोन अनोळखी आरोपी अद्याप फरार...

0
बारामती | प्रतिनिधी : बारामती शहरातील जळोची परिसरात किराणा दुकानात आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी महिलेच्या गळ्यातील सुमारे ₹4 लाख किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून मोटारसायकलवरून पलायन...

गावठी पिस्टल, ७ जिवंत काडतुसे आणि तलवारीसह आरोपी अटक; ₹७.६६ लाखांचा...

0
सासवड | प्रतिनिधी : सासवड पोलिसांनी मोरया सोसायटी परिसरात कारवाई करत गावठी बनावटीचे पिस्टल, दोन मॅगझीन, सात जिवंत काडतुसे आणि तलवार असा शस्त्रसाठा जप्त केला....

बारामतीत 20-22% परताव्याचे आमिष; ₹63.02 लाखांच्या कथित फसवणूक प्रकरणी पाच जणांवर...

0
मनन जहांगीर पाडवी, वंदनादेवी मनन पाडवी, अक्षय महादेव अहिवळे, सचिन बाळासाहेब डोंगरे व अक्षय गोमासे यांच्यासह एजंटांविरोधात कारवाई बारामती | प्रतिनिधी : दरमहा 20 ते 22...
- Advertisment -

Most Popular

सुपा पोलीस ठाण्यात आरोपींच्या मदतीसाठी दोन लाखांची मागणी केल्याचा आरोप; कथित...

0
५० हजार रुपयांच्या व्यवहाराचाही उल्लेख; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार का? मोरगाव, सुपा, ता. बारामती : बारामती तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वढाणे येथील एका...

काटेवाडीत जातिवाचक शिवीगाळ करत कोयता, चाकूने हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0
बारामती : बारामती तालुक्यातील दीपनगर, काटेवाडी येथे जातिवाचक शिवीगाळ करून कोयता, चाकू आणि उसाने मारहाण केल्याच्या आरोपावरून पाच जणांविरुद्ध बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

बारामतीत राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ला प्रकरणात दोघांना अटक; २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस...

0
बारामती, प्रतिनिधी : बारामतीतील पालखी महामार्गावर पायलट ढाब्यासमोर राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर पिस्तूलातून गोळीबार करून तसेच लोखंडी सत्तूरने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या...

बारामती सत्र न्यायालयाचा निकाल; अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी वडिलांना जन्मठेप, पीडितेला ५...

0
सावत्र आईची निर्दोष मुक्तता; बचाव पक्षाचे वकील अॅड. अमोल सोनवणे यांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा बारामती | प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या आणि...

खासगी रुग्णालयांना दरपत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारक; महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

0
मुंबई | प्रतिनिधी रुग्णांना उपचारांचा खर्च समजणे सोपे व्हावे, वैद्यकीय सेवांमध्ये पारदर्शकता यावी आणि अनावश्यक आर्थिक तक्रारी टाळता याव्यात, यासाठी राज्यातील खासगी रुग्णालये व इतर...

error: Content is protected !!