Homeक्राईमनिवेदन देऊनही कारवाई नाही; भिगवणमधील संशयित लॉजवर पोलिसांची ‘मेहरबानी’ का?

निवेदन देऊनही कारवाई नाही; भिगवणमधील संशयित लॉजवर पोलिसांची ‘मेहरबानी’ का?

वेश्या व्यवसायाच्या आरोपांवर तक्रार करूनही तपास थंडावला; पोलिसांच्या भूमिकेवर माहिती अधिकार कार्यकर्त्याचा सवाल
भिगवण | प्रतिनिधी :
भिगवण व परिसरातील काही लॉजमध्ये अनैतिक मानवी व्यापार व वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्याने माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी,बारामती तसेच भिगवण पोलीस ठाणे यांच्याकडे लेखी तक्रारी निवेदन देऊन गोपनीय चौकशी व कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. मात्र, निवेदन देऊनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप निकाळजे यांनी केला आहे.
निवेदनात भिगवण परिसरातील आनंद लॉज, सत्यजित लॉज, अशो का लॉज, आर्यन लॉज, शांतिबन लॉज तसेच इतर काही लॉजमध्ये अनैतिक पद्धतीने व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या ठिकाणी महिला-मुलींना आणणे, ग्राहक उपलब्ध करून देणे, लॉजच्या खोल्यांचा गैरवापर करणे किंवा दलालांमार्फत व्यवसाय चालविणे अशा प्रकारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात CCTV फुटेज, प्रवेश नोंदवही, ग्राहक नोंदणी रजिस्टर, ओळखपत्रांच्या नोंदी, खोल्यांचे बुकिंग रेकॉर्ड तसेच संबंधित लॉज मालक, व्यवस्थापक, कर्मचारी व दलालांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
“पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय एवढा व्यवसाय राज रोज कसा सुरू राहतो?”
निकाळजे यांनी आता पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “जर या लॉजमध्ये अशा प्रकारचा अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे, तर अद्याप कारवाई का झाली नाही? निवेदनानंतर गोपनीय चौकशी करण्यात आली का? CCTV व इतर रेकॉर्ड तपासण्यात आले का?” असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.
“पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात कथित वेश्या व्यवसाय रोज उघडपणे कसा सुरू राहू शकतो?” असा गंभीर प्रश्नही त्यांनी उपस्थित केला असून, संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मात्र, पोलिस प्रशासनाची अधिकृत चौकशी किंवा कारवाई होईपर्यंत संबंधित लॉज किंवा व्यक्ती दोषी आहेत असे निश्चितपणे म्हणता येणार नाही. त्यामुळे या तक्रारीची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्याची गरज आहे.
प्रशासन आता काय करणार?
निवेदनाला प्रतिसाद देऊन पोलिस प्रशासनाने चौकशी केली आहे का, कोणते पुरावे तपासले आहेत, संबंधित लॉजची तपासणी झाली का आणि काही गुन्हा आढळल्यास कोणती कारवाई करण्यात आली—याबाबतची माहिती प्रशासनाने स्पष्ट करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
“तक्रार करूनही कारवाई होत नसेल, तर नागरिकांनी नेमके कोणाकडे दाद मागायची?” असा सवाल उपस्थित करत निकाळजे यांनी या प्रकरणात तातडीने निष्पक्ष चौकशी व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे आणि लवकरच आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES

बारामतीत ₹4 लाखांचे मंगळसूत्र हिसकावून पळाले; दोन अनोळखी आरोपी अद्याप फरार...

0
बारामती | प्रतिनिधी : बारामती शहरातील जळोची परिसरात किराणा दुकानात आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी महिलेच्या गळ्यातील सुमारे ₹4 लाख किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून मोटारसायकलवरून पलायन...

बारामतीत ‘फ्लेक्सबंदी’चा नियम फक्त सामान्यांसाठी?

0
नगरपरिषदच बॅनर लावते; राजकीय फ्लेक्सवर कारवाई का नाही? छोट्या जाहिरातींवर मात्र थेट गुन्हे! बारामती | प्रतिनिधी : बारामती शहरातील अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, पोस्टर्स आणि जाहिरातींवर कारवाई...

गावठी पिस्टल, ७ जिवंत काडतुसे आणि तलवारीसह आरोपी अटक; ₹७.६६ लाखांचा...

0
सासवड | प्रतिनिधी : सासवड पोलिसांनी मोरया सोसायटी परिसरात कारवाई करत गावठी बनावटीचे पिस्टल, दोन मॅगझीन, सात जिवंत काडतुसे आणि तलवार असा शस्त्रसाठा जप्त केला....
- Advertisment -

Most Popular

सुपा पोलीस ठाण्यात आरोपींच्या मदतीसाठी दोन लाखांची मागणी केल्याचा आरोप; कथित...

0
५० हजार रुपयांच्या व्यवहाराचाही उल्लेख; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार का? मोरगाव, सुपा, ता. बारामती : बारामती तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वढाणे येथील एका...

काटेवाडीत जातिवाचक शिवीगाळ करत कोयता, चाकूने हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0
बारामती : बारामती तालुक्यातील दीपनगर, काटेवाडी येथे जातिवाचक शिवीगाळ करून कोयता, चाकू आणि उसाने मारहाण केल्याच्या आरोपावरून पाच जणांविरुद्ध बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

बारामतीत राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ला प्रकरणात दोघांना अटक; २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस...

0
बारामती, प्रतिनिधी : बारामतीतील पालखी महामार्गावर पायलट ढाब्यासमोर राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर पिस्तूलातून गोळीबार करून तसेच लोखंडी सत्तूरने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या...

बारामती सत्र न्यायालयाचा निकाल; अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी वडिलांना जन्मठेप, पीडितेला ५...

0
सावत्र आईची निर्दोष मुक्तता; बचाव पक्षाचे वकील अॅड. अमोल सोनवणे यांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा बारामती | प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या आणि...

खासगी रुग्णालयांना दरपत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारक; महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

0
मुंबई | प्रतिनिधी रुग्णांना उपचारांचा खर्च समजणे सोपे व्हावे, वैद्यकीय सेवांमध्ये पारदर्शकता यावी आणि अनावश्यक आर्थिक तक्रारी टाळता याव्यात, यासाठी राज्यातील खासगी रुग्णालये व इतर...

error: Content is protected !!